शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

Mr. Ashish Karle Short Cv Profile

Mr. Ashish Karle


Qualification: M. Pharm (Pharmaceutics)


Current Role: Assistant Professor, NCRD's Sterling Institute of Pharmacy


Other Role: YouTuber, Aamhi Pharmacist YouTube Channel (83,000 Subscribers)



Academic Qualifications


M. Pharm: D.D. Vispute College of Pharmacy, Panvel


B. Pharm: Gahlot Institute of Pharmacy, Navi Mumbai



Awards & Scholarships


1. Indian Pharmaceutical Association Student of the Year 2020



2. Tata Trust Healthcare Scholarship: 2020 (B. Pharm) & 2021 (M. Pharm)



3. Schott Fiolax Scholarship (2018): ₹25,000 for academic excellence



4. Best Student & Best Alumni Award, Gahlot Institute of Pharmacy (GIP)



5. GIP Institute Topper: B. Pharm (Sem 2 to Sem 8)




Publications


E-Book: Pharmacist Tumachya Aarogyasathi (E Sahitya Pratishthan)


Chapters: Nutraceuticals in Cancer Prevention, Management, and Treatment (CRC Press, Taylor & Francis Group)


Research Articles:


1. Development and Formulation of Nanosuspension Loaded Mouth Dissolving Film of Raloxifene HCl to Enhance Solubility (Bulletin Monumental Journal)



2. Click Chemistry: A Novel Tool in Pharmaceutical Research (Journal of Pharmaceutical Chemistry & Chemical Science)






---


मराठीमध्ये माहिती


श्री. आशिष कर्ले


शैक्षणिक पात्रता: एम. फार्म (फार्मास्युटिक्स)


सध्याचा पद: सहायक प्राध्यापक, NCRD च्या स्टर्लिंग फार्मसी कॉलेज


इतर भूमिका: यूट्यूबर, आम्ही फार्मासिस्ट YouTube चॅनल (83,000 सब्स्क्राइबर्स)



शैक्षणिक पात्रता


एम. फार्म: डी. डी. विस्पुते फार्मसी कॉलेज, पनवेल


बी. फार्म: गहलोत फार्मसी कॉलेज, नवी मुंबई



पुरस्कार व शिष्यवृत्ती


1. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन विद्यार्थी ऑफ द इयर 2020



2. टाटा ट्रस्ट हेल्थकेअर शिष्यवृत्ती: 2020 (बी. फार्म) व 2021 (एम. फार्म)



3. शॉट फिओलॅक्स शिष्यवृत्ती (2018): उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी ₹25,000



4. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी व माजी विद्यार्थी पुरस्कार, गहलोत फार्मसी कॉलेज



5. संस्थेतील सर्वोच्च गुणांने उत्तीर्ण: बी. फार्म (सत्र 2 ते सत्र 8)




प्रकाशने


ई-पुस्तक: फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी (ई साहित्य प्रतिष्ठान)


प्रकरणे: कर्करोग प्रतिबंध, व्यवस्थापन व उपचारासाठी पोषणपूरक (CRC प्रेस, टेलर आणि फ्रान्सिस ग्रुप)


संशोधन लेख:


1. रालॉक्सिफीन एचसीएलची विद्राव्यता वाढवण्यासाठी नॅनोसस्पेन्शन लोड केलेली माउथ डिझॉल्विंग फिल्म तयार करणे व तिचा फॉर्म्युलेशन (बुलेटिन मॉन्युमेंटल जर्नल)



2. क्लिक केमिस्ट्री: फार्मास्युटिकल संशोधनातील एक नवा मार्ग (जर्नल ऑफ फार्मास्युटिकल केमिस्ट्री व केमिकल सायन्स)

सोमवार, ८ एप्रिल, २०२४

My Publication Ashish Arun Karle

1) 3 Chapter Nutraceuticals in Cancer Prevention, Management, and Treatment

https://www.appleacademicpress.com/nutraceuticals-in-cancer-prevention-management-and-treatment-/9781774913277

2) Click chemistry: A novel tool in pharmaceutical research.

https://www.alliedacademies.org/articles/click-chemistry-a-novel-tool-in-pharmaceutical-research-20205.html


3)Nanosuspension Formulation by High Pressure Homogenization (HPH)

https://res.ijsrst.com/page.php?param=IJSRST229414


4) Marathi Articles

https://mumbai-front-end-f2ozxrcxxa-el.a.run.app/book/1258/51284

https://marathi.pratilipi.com/series/pharmacist-tumachya-arogyasathi-by-ashish-karle-zcqquyulkw4p


मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

कम्युनिटी फार्मसिस्ट

कम्युनिटी फार्मसिस्ट ही फार्मसी जगतात नव्याने उदयाला आलेली संकल्पना आहे जी सध्या खूप लोकप्रिय होत आहे पूर्वी कम्युनिटी फार्मसिस्टला केमिस्ट या नावाने ओळखले जायचे
कृत्रिम औषधांच्या लाभाच्या तुलनेने हानी आणि दुष्परिणाम जास्त दिसून येतात पण तरीही त्यांची जलद परिणामकता यामुळे त्यांनी स्वतःची एक विशेष ओळख व विश्वासार्हता निर्माण केली आहे.
कृत्रिम औषधांचे वितरण आणि वापर यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, त्रुटी दूर करण्याच्या संकल्पनेतून कम्युनिटी फार्मसिस्ट तसेच कम्युनिटी फार्मसी या आधुनिक संकल्पनेचा उदय झाला आहे.
कम्युनिटी फार्मसी ही औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) क्षेत्रातिल अशी शाखा आहे जिचा थेट संबंध हा औषधांचे वितरण औषधांचा योग्य वापर, रुग्ण समुपदेशन या सेवांशी आहे
दुसऱ्या शब्दात रुग्णांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य आणि औषध वापराबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन याच्याशी निगडित असणारी ही संकल्पना आहे.

इंग्लंडच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार इंग्लंडमध्ये दररोज १.६ दशलक्ष रुग्ण त्यांच्या आरोग्याविषयक समस्यांबाबत कम्युनिटी फार्मसिस्टची भेट घेतात. फार्मसीमध्ये रूग्ण समुपदेशनासाठी स्वतंत्र विभाग असतो
दुर्दैवाने आपल्या देशात डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधयोजनेनुसार औषधांचे वितरण करणे आणि इतर सर्व जबाबदारी ही डॉक्टरांवर अशी स्थिती आहे. फक्त डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधयोजनेनुसार औषधांचे वितरण करणे एवढंच नव्हे तर यापलीकडेही औषधयोजनेची सत्यता आणि वैधता तपासणे, औषधांची नोंद, रुग्ण इतिहास व रुग्ण समुपदेशन, औषधांचा रुगणांच्या शरीरावर होणाऱ्या सकारात्मक तसेच नकारात्मक परिणामांचा अभ्यास करणे ही त्याची कार्ये आहेत.
आपल्या देशातील या विदारक स्थितीला जितके रुग्ण जबाबदार आहेत तितकेच फार्मासिस्टही जबाबदार आहेत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. रुग्ण
वेळेच्या अभावाचे कारण देत रुग्ण समुपदेशनला नकार देतात अथवा काही फार्मासिस्ट आपली व्यावसायिक नैतिकता बाजूला ठेवत रुग्ण समुपदेशन टाळतात या दोनही गोष्टी या विदारक स्थितीला कारणीभूत आहे.
परंतु आता हळूहळू परिस्थिती बदलताना दिसत आहे. फार्मासिस्ट आपले आर्थिक लाभ बाजुला ठेवत रुग्णांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देत आहेत. फार्मसिस्ट रुग्ण समुपदेशनासाठी पुढाकार घेत आहेत. फार्मसी शॉपलाही आता एक प्रोफेशनल लूक येऊ लागला आहे. हा सर्व एकाएकी होणारा बदल नसून यासाठी वेळ द्यावा लागेल आणि आपल्यालाही फार्मासिस्टला सहकार्य कराव लागेल. फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा आहे.
चाल तर मग आपण सर्वानी सहकार्यच्या भावनेतून डॉक्टर रुग्ण आणि आम्ही फार्मासिस्ट मिळून आरोग्य रुपी त्रिकोण पूर्ण करू आणि देशातील फार्मसी व्यवसायाचा कायापालट करू.

We are Pharmacist Always Ready for Your Health Better Drugs for Better World.

गुरुवार, १४ जुलै, २०२२

कोरोनाच्या संकटात फार्मासिस्टची भूमिका!

फार्मासिस्ट म्हटलं की लोकांना आठवतो वाटतो तो केवळ एक औषधविक्रेता! पण खरंच फार्मासिस्ट म्हणजे केवळ औषध विक्रेता आहे का?अस असते तर मग नोंदणीकृत फार्मासिस्ट बनण्यासाठी फार्मसी संदर्भात शैक्षणिक पात्रता असण्याची आवश्यकताच नव्हती कोणीही औषधे विकली असतील ना!
आजच्या या कोरोनाच्या संकटात फार्मासिस्ट सुद्धा मागे नाही! या सर्व परिस्थिती फार्मासिस्ट सुद्धा कोरोना योध्दा म्हणून नेटाने लढत आहे जरी तो प्रकाशझोतात येत नसला तरी आपले आपले कर्तव्य नेटाने पार पाडत आहे!
फार्मासिस्ट केवळ औषध वितरण करणारी व्यक्ती नसून ती अशी व्यक्ती आहे जिला औषधांसंबंधित सविस्तर माहिती असते.या परिस्थितीत लोकांना सेल्फ मेडिकेशन पासून दूर ठेवून त्यांना योग्य सल्ला हा केवळ फार्मासिस्टच देऊ शकतो. आजच्या घडीला जिथे खाजगी डॉक्टरांना सांगावं लागत आहे की क्लिनिक सुरू ठेवा अन्यथा परवाने रद्द होतील तिथे दुसऱ्या बाजूला फार्मासिस्ट न सांगता अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णांच्या सेवेत हजर आहे
जर खोलवर जाऊन विचार केला तर कोरोनाच्या युद्धात फार्मासिस्टची भूमिका खूप महत्वाची आहे! फार्मासिस्ट लोकांना एक मानसिक आधार देऊ शकतो शिवाय लोकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार याबद्दल देखील मार्गदर्शन करू शकतो! इतकेच नव्हे तर मेडिकल (फार्मसी) मध्ये येणाऱ्या लोकांच्या नोंदी ठेवून ही माहिती प्रशासकीय यंत्रणांना कमी येऊ शकते.यामध्ये तो रुग्णांचे वय,रुग्ण इतिहास ज्यात जर त्यांना रक्तदाब,मधुमेह असे काही आजार असतील त्यांना कोरोना सदृश्य काही लक्षणे आढळत असतील तर ही माहिती तो ठेवू शकतो!
केवळ तो औषध वितरण नव्हे तर औषध संशोधन औषध निर्मिती या क्षेत्रात फार्मासिस्ट महत्वाचा आहे औषध वितरण तर त्याच्या कामाचा एक भाग आहे जो सर्वांच्या नजरेत येतो पण या पलीकडे देखील त्याच्या अनेक महत्वपूर्ण भूमिका आहेत.शिवाय औषध वितरण म्हणजे केवळ डॉक्टरांनी लिहून दिलेलं औषध देणे एवढेच नाही तर ती देखील एक वैद्यकीय प्रक्रिया आहे.ज्यामध्ये लोकांमध्ये सुरक्षित औषध वापर होऊ शकतो,दोन एकत्रित औषधांचा अनिष्ट परिणाम टाळता येतो ,प्रतिजैविके मधील औषध विरोध ही समस्या टाळता येते.
शिवाय हॉस्पिटलमध्ये सध्या कोव्हिड १९ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत यात डॉक्टरांसोबत क्लिनिकल फार्मासिस्टची भूमिका वाढवली तर उपचारादरम्यान औषधांच्या अनिष्ट परिणामामुळे रुग्ण दगवत आहेत हे प्रमाण टाळता येईल.शिवाय कमीत कमी औषध मात्र (डोस) वापरून कमीत कमी साईड इफेक्ट्स सह चांगले उपचार देण्यासाठी फार्मासिस्टची भूमिका मोलाची ठरू शकते.
त्याचबरोबरीने औषध संशोधन हे क्षेत्र आहे जिथे औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये औषध संशोधन (R&D) विभाग इथे देखील फार्मासिस्टची भूमिका महत्त्वाची आहे.
या सद्यस्थितीत सर्व ऑनलाइन औषध सेवा नाही तर आपला जवळचा फार्मासिस्टच अत्यावश्यक सेवा म्हणून औषध सेवा देत आहेत! हा केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी आहे यात!
फार्मासिस्ट म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर येते ते मेडिकल आणि तिथे औषध विक्री करणारा एक व्यवसायिक पण खरंच फार्मासिस्ट म्हणजे काय केवळ औषध विक्री करणारा एक व्यावसायिक नसून तो देखील आरोग्य यंत्रनेचा एक भाग आहे आणि कोरोना परिस्थितीत त्याची भूमिका महत्त्वाची आहे!
ज्यावेळी आपण एखादा चित्रपट किंवा नाटक बघतो तेव्हा आपल्या लक्षात केवळ नायक नायिकाच राहतात! केवळ नायक-नायिकाच प्रकाश झोतात येतात त्यांना केवळ प्रसिद्धी मानसन्मान भेटतो पण दुसऱ्या बाजूला हा चित्रपट किंवा नाटक आपल्यासमोर येण्यासाठी पडद्यामागे राहून कित्येक कलाकार व तंत्रज्ञ व सहकलाकार काम करत असतात मेहनत घेत असतात खरे पाहता त्यांच्यात मेहनतीतून व कष्टातून इतकी सुंदर कलाकृती आपल्यापर्यंत पोहोचत असते पण दुर्दैव आणि ते मात्र कधीच प्रकाशझोतात येत नाहीत ना त्यांना कधी प्रसिद्धी व मानसन्मान मिळत नाही.अशीच काहीशी अवस्था आरोग्य यंत्रणेतील अविभाज्य घटक असलेल्या फार्मासिस्टची ची झालेली आहे!
कला क्षेत्रात पडद्यामागे राहून काम करणाऱ्या कलाकार,तंत्रज्ञ व सहकलाकारांप्रमाणेच तो देखील अनेक महत्वाच्या भूमिका बजावत असतो पण त्याचे ते कार्य व मेहनत मात्र कधीच लोकांपर्यंत पोहचत नाही!
औषध वितरण हे फार्मासिस्टच्या सेवेच एक अंग झालं त्यापलीकडे देखील तो अनेक महत्वाच्या जाबाबऱ्या व भूमिका निभावत असतो जे की लोकांना कधी माहीतच नसत!
सध्या या कोरोना विरुद्ध लढणारे डॉक्टर, नर्स यांचे समाज मध्यम,मीडिया याद्वारे आभार मानत आहेत त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत आहेत पण फार्मासिस्टचा मात्र कोणी साधा उल्लेख सुद्धा करत नाही! आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं ट्विट वगळता कोणीही फार्मासिस्टबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाही त्यांचे आभार मानत नाहीत
फार्मासिस्ट सुद्धा आवल्या परीने नेटाने या कोरोना विरुद्ध लढा देत आहे पण तरीही त्याच्या पदरी मात्र केवळ उपेक्षाच आहे तथापि त्याने आपल्या या आरोग्य सेवेच हे अविरत व्रत कुठेही थांबवलेल नाही आणि कधीच थांबवणारही नाही!
डॉक्टर जे औषध लिहीतात आणि ते फार्मासिस्ट देतो केवळ इथपर्यंतच लोकांना माहिती आहे पण या दरम्यान या औषधाचे संशोधन इथपासून ते त्याचे प्रिक्लिनिकल स्टडी प्राण्यामध्ये त्या औषधाच्या सुरक्षिततेचा अभ्यास,त्यानंतर क्लिनिकल ट्रायल अर्थात ठराविक लोकांचा व रुग्णाचा समूह यावर वेगवेगळ्या फेज मध्ये औषधांचा अभ्यास आणि हे सगळं झाल्यावर हे औषधाची निर्मिती,मार्केटिंग व मार्केट मध्ये आल्यानंतर देखील त्याच्या सुरक्षिततेची पडताळणी करण्यासाठी फर्माकोव्हीजलन्स ज्यामध्ये औषधाचे दुष्परिणाम याबद्दल येणाऱ्या सांख्यिकी महितीवर काम करणं या सर्व क्षेत्रात फार्मसिस्ट आपली भूमिका पार पाडत असतो!औषध वितरण हे तर फार्मासिस्टच्या कामाचे एक अंग झाले पण त्यापलीकडे देखील या सर्व कामात फार्मासिस्ट जबाबदाऱ्या पार पाडत असतो
पण दुर्दैवाने ज्याप्रमाणे कलाक्षेत्रात पडद्यामागे राहून काम करणाऱ्या कलाकारांचं काम जसे सर्वांसमोर येत नाही तसेच फार्मासिस्टच्या या भूमिका प्रकाशझोतात येत नाहीत! सध्या कोरोना वरील औषध संशोधन यातही फार्मासिस्टची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
आज सर्वजण डॉक्टर आणि नर्स चे आभार मानत आहेत पण फारसा दिसला मात्र सर्वजण विसरले आहेत तरीदेखील आपला फार्मासिस्ट आपल्या कर्तव्यात कुठेही मागे नाही!
फार्मा क्षेत्रातील रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभात आजही कोरोनासाठी औषध व लस यावर संशोधन सुरू आहे जलद तपासणी चाचण्या करण्यासाठी किट बनवण्यासाठी काम सुरू आहे औषध पुरवठा सुरळीत राहावा म्हणून फार्मास्युटिकल इंडस्ट्री मध्ये फार्मासिस्ट काम करत आहेत.औषध सेवा सुरू राहावी अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून म्हणून कम्युनिटी फार्मासिस्ट काम करत आहे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नर्स यांच्या प्रमाणेच हॉस्पिटल फार्मासिस्ट व क्लिनिकल फार्मासिस्ट देखील आपली जबाबदारी निभावत आहे
पडद्यामागे असला तरी फार्मासिस्ट देखील आपल्या परीने नेटाने कोरोनविरुद्ध लढत आहे आणि पुढेही आरोग्य यंत्रणेचा अविभाज्य घटक व समाजाप्रती बांधिलकी या नात्याने अशीच अविरत सेवा देत राहणार!
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी!

आशिष अरुण कर्ले.

M.Pharm Pharmaceutics

(फार्मासिस्ट,लेखक,यु ट्युबर)

लेखक फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी! ई साहित्यई पुस्तक!

यु ट्युबर आम्ही फार्मासिस्ट यु ट्यूब वाहिनी


गुरुवार, १२ मे, २०२२

फार्मसी अभ्यासक्रमातील विविध विषय!

 यापूर्वी आपण फार्मसी करिअर साठी एक उत्तम पर्याय या लेखामध्ये फार्मसी बद्दल तपशीलवार माहिती तसेच या क्षेत्रात आपण कसे येऊ शकता, यातील करिअरच्या विविध संधी याची माहिती घेतली होती.

जे विद्यार्थी फार्मसी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना माहिती मिळावी म्हणून या लेखामध्ये आपण फार्मसी या अभ्यासक्रमात कोणकोणत्या विविध विषयांचा अभ्यास केला जातो व त्या विषयाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ…
१)औषधनिर्मिती शास्त्र (Pharmaceutics): या विषयात मोठ्या प्रमाणात औषध निर्मिती शिवाय प्रयोगशाळा स्तरावर औषध निर्मिती व त्याचा अभ्यास, त्यामधील विविध टप्पे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. या मध्ये औषध बनवण्यासाठी लागणारे घटक, औषधांचे तसेच ते बनवण्यासाठी लागणारे घटक यांचे रासायनिक व भौतिक गुणधर्म आशा अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो.दुसऱ्या शब्दात औषधनिर्मिती शास्त्र हा विषय खऱ्या अर्थाने फार्मसी प्रोफेशनचा एक मूलभूत भाग आहे.
२)औषधीशास्त्र (Pharmacology) : फार्मसी मधील हा एक अत्यंत महत्वपूर्ण विषय असून यामध्ये शरीराचा औषधांवर होणार परिणाम व औषधाचा शरीरावर होणार परिणाम, औषध कशा प्रकारे काम करते , औषधांच्या वापरामुळे होणारे अनिष्ट परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो.
३)औषधीवनस्पती शास्त्र (Pharmacognosy): या विषयामध्ये वनस्पती तसेच नैसर्गिक स्त्रोत यापासून मिळवलेली औषधे, त्यातील मुख्य घटक, या घटकांची कृत्रिम रासायनिक पध्दतीचा वापर करून नवनवीन औषधांची निर्मिती करणे, आशा नैसर्गिक औषधांच्या रासायनिक व भौतिक गुणधर्माचा अभ्यास या विषयात केला जातो.
४)जैवरसायन शास्त्र (Biochemistry): यामध्ये मानवी शरीरातील विविध रासायनिक पदार्थ जसे प्रोटीन, व्हिटॅमिन, डी एन ए, आपल्या आहारातील घटकांचा रासायनिक दृष्टीने अभ्यास या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो.
५) सेंद्रिय रसायनशास्त्र (Organic Chemistry): यामध्ये विविध रासायनिक घटक व त्यांचा रासायनिक व भौतिक गुणधर्माचा अभ्यास केला जातो.
६) सूक्ष्मजीव शास्त्र (Microbiology) :या विषयात विविध सुक्ष्म जिवांचा लाभदायक तसेच हानिकारक सुक्ष्म जीव (रोगजंतू), यामुळे होणारे विविध आजार व त्यावरील उपचा या गोष्टींचा अभ्यास केला जातो.
७)मनवी शरीरशास्त्र : यामध्ये मनवी शरीरातील विविध संस्था तसेच या संस्थांची कार्यपद्धती, यामध्ये येणारे विविध अडथळे, विविध आजार आशा गोष्टींचा अभ्यास केला जातो.
८)हॉस्पिटल फार्मसी: यामध्ये हॉस्पिटल मधील फार्मसिस्ट ची कामे त्याची कर्तव्य आणि हॉस्पिटलमधील Pharmacy and Therapeutic Committee PTC मधील फार्मसिस्ट ची भूमिका या सर्वांचा अभ्यास केला जातो.
९)डिस्पेनसिंग फार्मसी आणि कम्युनिटी फार्मसी: यामध्ये औषध निमिर्ती व वितरण तसेच नव्याने आलेली संकल्पना कम्युनिटी फार्मसी ज्यामध्ये संपूर्ण सामाजिक दृष्टीकोणातून लोकांच्या फार्मसिस्टची भूमिका या सर्वांचा अभ्यास केला जातो.
१०)भौतिकशास्त्रविषयक फार्मसी (Physical Pharmacy): या विषयामध्ये औषधनिर्माणशास्त्राच्या दृष्टीने महत्वपूर्ण भौतिक संकल्पनाचा अभ्यास केला जातो.
११)औषधनिर्मितीविषयक अभियांत्रिकी (Pharmaceutical Engineering): याविषयामध्ये औषधनिर्मिती संदर्भात वापरली जाणारी उपकरणे, यंत्रे याबद्दल अभ्यास केला जातो.
१२)औषधनिर्मितीविषयक व्यवस्थापन (Pharmaceutical Management): या विषयामध्ये औषधनिर्माणशास्त्र विषयक व्यवस्थापन यासंदर्भात विविध संकल्पना यांचा तपशीलवार अभ्यास केला जातो.
१३)औषधनिर्मितीविषयक जैवतंत्रज्ञान (Pharmaceutical Biotechnology): या विषयामध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर करून औषध निर्मिती व जैवतंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्र व फार्मसीसंदर्भातील जैवतंत्रज्ञानाचा वापर या सर्व गोष्टींचा तपशीलवार अभ्यास केला जातो.
१४)औषधविषयक रसायनशास्त्र (Medicinal Chemistry):या विषयामध्ये औषधा संदर्भातील रसायनशास्त्र, विविध रासायनिक गुणधर्म आशा गोष्टींचा तपशीलवार अभ्यास केला जातो.
१५)न्यायवैद्यकशास्त्रविषयक फार्मसी (फॉरेन्सिक फार्मसी)
१६)औषधनिर्माणशास्त्रविषयक कायदे.

फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी…!!

खाली फार्मसी मधील विविध विषय, डी फार्म बी फार्म अभ्यासक्रम नोट्स अभ्यास याबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न याबाबत मार्गदर्शन व माहितीवर आधारित व्हिडीओ दिले आहेत नक्की पहा!

Pharmacy subject Syllabus related information video

Pharmacy Different Subject and 11th 12th IMP Subject for Phrmacy


Pharmacy D Pharm B Pharm Different Subject Syllabus Guidance Live Session Video



D Pharm PCI Syllabus discussion Practical Exam Pattern Marking Scheme Video


Pharmacy Study Notes Guidance video


Pharmacy Study Notes Guidance Live Session video



 

आशिष अरुण कर्ले.

फार्मासिस्ट,लेखक,यु ट्युबर

लेखक फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी! ई साहित्यई पुस्तक! 

यु ट्युबर आम्ही फार्मासिस्ट यु ट्यूब वाहिनी

औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय Pharmacy As Career option Marathi

 औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...

फार्मसिस्ट हा आरोग्यविषयक सेवा पुरवणाऱ्या प्रोफेशन पैकी एक महत्वाचा भाग आहे.औषध निर्मिती व वितरण,औषधवापराबाबत रुग्णांना मार्गदर्शन करणे हे फार्मासिस्टचे काम असते. वाढते आजार, औषधसंशोधन क्षेत्रात निर्माण झालेल्या संधी, देशांतर्गत व देशाबाहेर वाढलेली औषधांची मागणी यामुळे या क्षेत्रात अनेक नोकरीच्या संधी व करिअर साठी चांगला पर्याय बनला आहे.
या लेखामध्ये आपण तुम्ही या क्षेत्रात कसे येऊ शकता त्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे व इतर अनेक गोष्टींचा आढावा घेणार आहोत.

Pharmacy as Career option info video



फार्मसी क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही दहावी + बारावी विज्ञान शाखा आणि महाराष्ट्र राज्य सामाईक (MH CET) परीक्षा देणं अनिवार्य आहे. बारावीमध्ये PCB (Physic Chemistry Biology), PCM (Physic Chemistry Mathematics ), PCMB (Physics Chemistry Mathematics Biology) यापुढे आपण Physics = भौतिकशास्त्र, Chemistry = रसायनशास्त्र, Mathematics = गणित, Biology = जीवशास्त्र असे म्हणू. यांपैकी कोणताही गृप असलेले विद्यार्थी फार्मसीला प्रवेश घेऊ शकतात यासाठी तुम्ही गृप पात्रता फेरी निकष पूर्ण करणे (Group Qualifier) म्हणजेच ग्रुपच्या प्रत्येक विषयात 50 गुण असणे आवश्यक आहे (हा नियम खुल्या प्रवर्गासाठी आहे इतर प्रवर्गासाठी सवलत आहे) तुम्ही जर आता बारावीत आसल तर तुम्ही दोन्ही विषय जीवशास्त्र आणि गणित ठेवलेला फायदेशीर ठरते हे क्षेत्र पूर्णपणे आरोग्यविषयक आहे त्यामुळे Human anatomy Pathology Biochemistry Pharmacology Microbiology Biotechnology या विषयांच्या दृष्टीने जीवशास्त्र हा विषय महत्वाचा आहे तर दुसऱ्या बाजूला पदवी अभ्यासक्रमात दुसऱ्य वर्षी गणित हा विषय असतो त्यामुळे दोन्ही विषय असलेले फायदेशीर ठरते. गणितापेक्षाही जीवशास्त्र विषय जास्त महत्वाचा ठरतो कारण वरती नमूद केल्याप्रमाणे फार्मसीमधिल बरेचसे विषय याच्याशी संबंधित आहेत.तुम्ही या क्षेत्रात तीन प्रकारे येऊ शकता कोणत्याही प्रकारे या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला वर नमूद केलेली शैक्षणिक पात्रता पुर्ण असणे गरजेचे आहे.

पहिला पर्याय म्हणजे तुम्ही बारावी विज्ञान शाखेनंतर डिप्लोमा (D Pharmacy) हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून या क्षेत्रात येऊ शकता. डिप्लोमा नंतर तुम्हाला थेट द्वितीय वर्षात पदवी (B Pharmacy) साठी प्रवेश मिळतो. यासाठी तुम्हाला डिप्लोमाला किमान 50% गुण असणे अनिवार्य आहे.
दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही बारावी विज्ञान शाखेनंतर पदवी (B Pharmacy) या चार वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता. B Pharmacy नंतर M Pharmacy, MBA, PhD, Doctorate of Pharmacy (Pharma D) या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत.
तिसरा पर्याय म्हणजे बारावी विज्ञान शाखेतनंतर तुम्ही डॉक्टरेट ऑफ फार्मसी (Pharma D) या सहा वर्षांच्या अभ्यासक्रमला प्रवेश घेऊ शकता. जत तुम्ही B Pharmacy ही पदवी पूर्ण केली असेल तर तुम्हाला डॉक्टरेट ऑफ फार्मसी(Pharma D) या अभ्यासक्रमात थेट 4th year प्रवेश मिळू शकतो.
वरती नमूद केलेल्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने https://www.dtemaharashtra.gov.in


 या तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (Directorate of Technical Education, Maharashtra State) यांच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे केली जाते. यासंदर्भात सर्व निकष,अटी,नियम,सूचना या संकेतस्थळावर महितीपुस्तकात उपलब्ध आहे.

खाली फार्मसी मधील विविध कोर्स,ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न याबाबत माहितीवर आधारित व्हिडीओ दिले आहेत नक्की पहा!


D Pharm vs B Pharm information video




B Pharm Course Information



M Pharm Course Information


.

Pharm D Doctor of Pharmacy Course information video



Pharmacy Online Admission Process Video



Pharmacy Admission All your doubt




आशिष अरुण कर्ले.

(फार्मासिस्ट,लेखक,यु ट्युबर)

लेखक फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी! ई साहित्यई पुस्तक!

यु ट्युबर आम्ही फार्मासिस्ट यु ट्यूब वाहिनी